

इंधनाच्या साठेबाजीवर नजर
जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना, कारवाईचे संकेत
पालघर, ता. २८ ः पालघर जिल्ह्यामध्ये पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. तसेच साठेबाजी करणाऱ्यांवरही कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लागू करत असल्याचे जिल्हाधिकारी जाखड यांनी दिले आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरचा साठाही जिल्ह्याला प्राप्त होत असून आवश्यकतेनुसार पुरेसा साठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नसून जिल्ह्यात पुरसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जाखड यांनी दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले उपस्थित होते.
--------------------------------
नियमांचे उल्लंघन भोवणार
जिल्ह्यात पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाची मुक्त विक्री झाल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत अधिकारांचा वापर करत कॅन, ड्रममध्ये पेट्रोल देण्यास मज्जाव केला आहे. बेकायदा साठा किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’अंतर्गत कठोर कारवाई होणार आहे.
-----------------------------
मुख्य निर्देश
- पेट्रोल, डिझेल इंधन टाकीतच भरणे
- कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्रीस मनाई
- पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा बंधनकारक
- विक्री नोंदी अद्ययावत ठेवण्याचे आदेश
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.