

गारमाळ ग्रामस्थ संकटात
पाणीटंचाईमुळे वणवण भटकण्याची वेळ
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ गावात भीषण पाणीटंचाई आहे. गावातील विहिरी, इतर नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहेत.
पाण्याअभावी गावातील महिलांना दररोज पायपीट करावी लागत आहे. यामुळे वेळ, श्रम तसेच आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर खुडेद ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले; मात्र अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.