माफक दरात शवपेट्यांची सेवा

माफक दरात शवपेट्यांची सेवा
Published on

माफक दरात शवपेट्यांची सेवा
विरार (बातमीदार) ः वसई-विरारकरांना शवपेट्यांच्या उपलब्धतेसाठी पालिकेच्या शवागारांवर विसंबून राहण्याऐवजी शहरातील सेवाभावी संस्था, चॅरिटेबल हॉस्पिटल्सतर्फे शवपेट्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने अत्यंत माफक दरात सेवा उपलब्ध होणार आहे. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शवपेट्यांची संख्या वाढवण्याची आग्रही मागणी केली होती. विशेषतः विराटनगर येथील स्मशानभूमीतील शवागारामध्ये मृतदेहांची विटंबना होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीवर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत शहरातील सेवाभावी संस्था, चॅरिटेबल हॉस्पिटल्सतर्फे सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com