बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दिलासा

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दिलासा
Published on

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दिलासा
जैमुनी पतपेढीच्या ३९ लाखांच्या कर्जाची वसुली

विरार, ता. २८ (बातमीदार) ः बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित जमिनींच्या मोबदल्यातून ‘जैमुनी’ पतपेढीच्या थकीत घोटाळा कर्जाची ३९ लाख १८ हजारांची वसुली करण्यात आली आहे. आमदार राजन नाईक यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे कायदेशीर लढ्याला यश आले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पातून तारण मालमत्तेचा प्राधिकरणाकडून थेट मोबदला मिळवणारी जैमुनी ही एकमेव आर्थिक संस्था ठरली आहे. २५ मार्चला ही मोठी रक्कम संस्थेच्या खात्यात जमा झाली आहे. बोईसर पूर्वेकडील एका प्रकल्पातील काही मालमत्ता जैमुनी कर्ज घोटाळा प्रकरणात तारण होत्या. त्यापैकी चार कर्जे थकीत होती. पालघर येथील सक्षम प्राधिकरणाकडे संस्थेने आपल्या तारणी हक्काची रीतसर नोंद केली होती. डिसेंबर २०२२ मध्ये जमिनींच्या मोबदल्याचा निवाडा जाहीर होऊन विकसक, जमीनमालक, खरेदीदार यांना मोबदला मिळू लागला; मात्र संस्थेने सात वेळा मागणीपत्रे देऊनही तत्कालीन प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊनही प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे वसुलीचे काम पूर्णपणे रखडले होते. अखेर आमदार नाईक यांनी स्वतः लक्ष घालत पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com