चुलीवरील जेवणाचे घरोघरी बेत

चुलीवरील जेवणाचे घरोघरी बेत
Published on

चुलीवरील जेवणाचे घरोघरी बेत
वसई पूर्वेतील गावांमध्ये सिलिंडरचा तुटवडा
विरार, ता.२८ (बातमीदार)ः देशातील अनेक भागांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंबांना पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे.
वसई पूर्वेतील तारकेनगर गावातील महिलांनी घरा बाहेर चुली पेटवूनस्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. महिलांना लाकूड गोळा करून चुली पेटवून अन्न शिजवावे लागत असल्याने अतिरिक्त कष्ट सहन करावे लागत आहेत. तसेच धुरामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त आहे. विशेष म्हणजे, आधुनिक काळातही नागरिकांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सिलिंडरचा पुरवठ्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com