

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान
जव्हारमध्ये तालुकास्तरीय पुरस्कार सोहळा
जव्हार, ता. २८ (बातमीदार) ः तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा जव्हार पंचायत समिती जव्हार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला. के. व्ही. हायस्कूल येथे शुक्रवारी (ता. २७) सकाळी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिक्षण, क्रीडा, स्वच्छता, गुणवत्ताविकास, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. आदिवासी भागातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचा विशेष उल्लेख करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी लहू मोहंडकर (केळीचा पाडा), प्रकाश वाघ (पवारपाडा), रमेश सापटे (दाभेरी), बंडू धुमळ (पिंपळशेत), प्रकाश लहारे (बारसे पाडा), विनायक भोये (कोगडे क्र. ३), अशोक गंभीर (चामील पाडा), डॉली बारबते (कौलाळे), अनंता महाले यांची निवड करण्यात आली. तर शिक्षण, क्रीडा, स्वच्छता, गुणवत्ता विकास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांचा विशेष गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.