राजेंद्र माच्छींचे नगराध्यक्षपद धोक्यात?

राजेंद्र माच्छींचे नगराध्यक्षपद धोक्यात?
Published on

राजेंद्र माच्छींचे नगराध्यक्षपद धोक्यात?
पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेसाठी याचिका

कासा, ता. २८ (बातमीदार) ः डहाणू नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्या निवडणूक अर्जात मालमत्ता, जबाबदाऱ्यांबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा फिरोज जमशेदजी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या न्यायालयात १८ मार्चला याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नगराध्यक्ष माच्छी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम १६ व ४४चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवासस्थानाच्या बांधकामात एफएसआय, सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता अद्याप तपासाधीन असून अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. तर हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका काही नगरसेवकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com