

टेनिस क्रिकेट खेळाडूंवर कोणतेही निर्बंध नाहीत
आयटीसीएसएफची स्पष्ट भूमिका
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : टेनिस क्रिकेट हा प्रामुख्याने ग्रामीण आणि मध्यमवर्गीय तरुणांचा खेळ आहे. या खेळाडूंच्या प्रगतीसाठी मुक्त व्यासपीठ मिळणे आवश्यक असून, त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादणे अन्यायकारक आहे, अशी ठाम भूमिका आयटीसीएसएफ महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. खेळाडूंच्या स्वातंत्र्याचा आदर करीत त्यांना सक्षम करण्यावर संस्थेने भर दिला आहे.
सध्या काही ठिकाणी खेळाडूंना विशिष्ट स्पर्धांव्यतिरिक्त इतरत्र खेळण्यास बंदी घातली जात असल्याची चर्चा आहे. यावर आयटीसीएसएफने आक्षेप घेतला आहे. संस्थेच्या मते ९० टक्के खेळाडू सर्वसामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांना विविध स्पर्धांतून अनुभव आणि उत्पन्न मिळवणे गरजेचे असते. खेळाडूंना एकाच चौकटीत अडकवणे त्यांच्या करिअरसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे खेळाडूंनी आयटीसीएसएफसोबतच इतरही स्पर्धांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बक्षीस रक्कम आता थेट एक कोटी!
खेळाडूंच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळावा यासाठी संस्थेने निर्णय घेतला आहे. आगामी ‘प्रेसिडेंट्स कप इंडिया’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही स्पर्धा ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत देशातील १६ राज्यांमध्ये आयोजित केली जाणार असून, याद्वारे हजारो तरुणांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे.
विनाशुल्क नोंदणी
आयटीसीएसएफने खेळाडूंसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. खेळाडूंकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. गुणवंत खेळाडूंना करिअर आणि नोकरीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाईल. टेनिस क्रिकेटचा शालेय स्तरावर समावेश व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.