महापालिकेच्या कारवाई नंतर मंडप डेकोरेटर्सची भूमिका

महापालिकेच्या कारवाई नंतर मंडप डेकोरेटर्सची भूमिका
Published on

नियमांचे पालन करू!
महापालिकेच्या कारवाईनंतर मंडप डेकोरेटर्सची भूमिका

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : मिरा रोडमध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर शहारातील सर्व गोदामे व शेडवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मंडप डेकोरेटरच्या संघटनेने आयुक्त व महापौर यांची भेट घेऊन महापालिकेच्या सर्व अटी व नियमांचे पालन करण्याची हमी दिली आहे.
मिरा रोड येथील एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्यामुळे जवळपासच्या शेकडो कुटुंबांचे जीव धोक्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसानदेखील झाले. त्यानंतर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील सर्व गोदामांच्या शेडवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने कारवाई सुरूही केली. त्यात मंडप डोकोरेटरचा व्यवसाय करणाऱ्यांच्या गोदामांचादेखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर डेकोरेटर्स अँड कॅटरर्स वेल्फेअर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने महापौर डिंपल मेहता व आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली.
डेकोरेटर व कॅटरर आपले सामान तात्पुरते गोदाम उभारून त्यात ठेवत असतात. कोरोना काळात दोन वर्षे हा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यातून हा व्यवसाय सध्या सावरत आहे. या व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे महापालिकेने कारवाई करताना सहानुभूतीपूर्वक विचार करावा. महापालिकेने तात्पुरत्या गोदामासंदर्भात धोरण निश्चित करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, या मार्गदर्शक तत्त्वांचे मंडप डेकोरेटर्स तंतोतंत पालन करतील, तसेच या गोदामांसाठी आवश्यक ते शुल्क भरण्यास तयार असून गोदामामुळे जवळपासच्या रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी हमी मंडप डेकोरेटर्सने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com