सिडकोने खारघर मधील वृक्षतोड केल्यास न्यायालयात धाव घेणार - प्रेरणा सामाजिक संस्था.

सिडकोने खारघर मधील वृक्षतोड केल्यास न्यायालयात धाव घेणार - प्रेरणा सामाजिक संस्था.
Published on

खारघरमध्ये वृक्षतोड केल्यास न्यायालयात धाव घेणार
प्रेरणा सामाजिक संस्थेचा इशारा
खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर परिसरातील भूमिगत वीज वाहिन्या जोडणीसाठी सिडकोकडून १२७ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. या निर्णायावर प्रेरणा सामाजिक संस्थेने आक्षेप घेतला असून ही वृक्षतोड चिंताजनक असल्याचे म्हंटले आहे. सिडकोने वृक्षतोड करू नये. वृक्षतोड केल्यास हरित लवादा अथवा न्यायालयात दाद मागू, असा इशारा संस्थेने दिले आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी सिडको आणि पर्यावरण मंत्र्याकडे पत्र पाठवले आहे.
खारघरमधील उत्सव चौक ते मेट्रो स्थानकादरम्यान उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामासाठी सिडकोकडून तब्बल १२७ झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे जाहिरातीमधून समोर आले आहे. सिडकोकडून या संदर्भात निविदा प्रक्रियाही पार पडलेली असल्याची माहिती समोर येत आहे. वीज वाहिन्या टाकताना पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या प्रकरणात सिडकोकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यापूर्वी सिडकोने पांडवकडा परिसरात ४०० केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांसाठी खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती. खारघर हे जागतिक दर्जाचे शहर असून, त्याच्या हरित व पर्यावरणपूरक रचनेमुळे त्याला विशेष ओळख प्राप्त झाली आहे. परंतु, काही वर्षांपासून सिडकोकडून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाबाबतीत दुर्लक्ष करत असल्याचे संस्थेने म्हंटले आहे. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी खारघर सेक्टर ५ व ६ मधील प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करावी अन्यथा हरित लवादाकडे अथवा न्यायालयात दाद मागावी लागेल, असे पत्र प्रेरणा किरण पाटील यांनी सिडको, आयुक्त आणि पर्यावरण मंत्र्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com