पनवेल महापालिकेची अटकावणी व जप्ती मोहीम तीव्र

पनवेल महापालिकेची अटकावणी व जप्ती मोहीम तीव्र
Published on

थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम तीव्र
पनवेल महापालिकेची १३८ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई
पनवेल, ता. २८ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार मालमत्ता थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम तीव्र केली आहे. नोटीस देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांवर व मालमत्ता धारकांवर अटकवणीची कारवाई पालिकेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध नोडमध्ये सुमारे एक हजार ६७३ नोटीसांचे वाटप केले असून एकूण १३८ थकबाकीदार मालमत्ता धारकांवर अटकवणीची कारवाई केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका प्रशासन थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलत आहे. उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिक्षक महेश गायकवाड आणि कर अधिक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वात जप्ती व वसुली कारवाईला गती दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात तीन लाख ६९ हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे नऊ झोन (नोड) तयार केले आहेत.

एकूण नोंदणीकृत मालमत्ता: ३ लाख ६९ हजार (निवासी, व्यावसायिक, औद्योगिक).
एकूण कराची मागणी: २२८८.८६ कोटी रुपये.
आतापर्यंत झालेली वसुली: ६८१.०९ कोटी रुपये.
थकीत रक्कम: १६०७.७७ कोटी रुपये.

तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या टॅक्स भरणे सुलभ
१. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापलिकेने ऑनलाईन पीएमसी कर मित्र'' ॲप सुरू केले आहे. तसेच, अधिकृत वेबसाईटवरही नागरिकांना कर भरता येणार आहे. पनवेल कनेक्ट ॲपच्या माध्यमातूनही करविषयक तक्रार निवारणाची सोय उपलब्ध आहे.
२. यासोबतच पालिकेकडून हेल्पलाईन क्रमांक नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे.
३. ३१ मार्च ही मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख असून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर वसुली विभाग, लेखा विभाग, नागरी सुविधा केंद्र, पाणी कर संकलन विभाग, प्रभाग समिती अ, ब, क, ड व नावडे उपविभाग सुरू राहणार आहे.

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. महापालिकेची विविध विकास कामे सध्या सुरु असून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेस सहाकार्य करावे.
- स्वरूप खारगे, उपायुक्त पनवेल महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com