ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले

ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले
Published on

ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले
मोठी आवक झाल्याचा परिणाम
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : उन्हाचा कडाका वाढत असून शरीराला थंडावा देणाऱ्या रसाळ फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार फळांच्या दरात ही वाढ होते. मात्र, यंदा फळांची आवक वाढल्याने बाजारात दर घसरलेले पाहायला मिळत आहेत. पुढच्या महिनाभर तरी हे दर असेच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई आणि द्राक्षे या फळांना सर्वाधिक पसंती दिली जाते. वाशीच्या घाऊक बाजारात दररोज कलिंगडाच्या ४० ते ४५ गाड्यांची आवक होत आहे. आवक जास्त असल्याने किमती निम्म्यावर आल्या आहेत. घाऊक बाजारातील किंमतीवरील परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी १०० ते १२० रुपयांना मिळणारे कलिंगड आता अवघ्या ५० रुपयांत उपलब्ध होत आहे. द्राक्षांचे दरही किरकोळ बाजारात १५० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत, जे पूर्वी २५० रुपयांच्या घरात होते. दरातील या घसरणीमुळे फळप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या खिशावरील ताण काहीसा कमी झाला आहे. बाजारात आवक कायम राहिल्यास पुढील महिनाभर तरी फळांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

घाऊक बाजारातील दरात फरक (प्रति किलो):
फळ आधीचे दर घाऊक सध्याचे दर घाऊक
कलिंगड २५ ते ३० रुपये १० ते १५ रुपये
टरबूज ३० ते ३५ रुपये १८ ते २५ रुपये
पपई २० ते ३० रुपये १५ ते २० रुपये
द्राक्षे २०० ते २५० रुपये १०० रुपये (सरासरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com