महापालिकेपुढे ९०० कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट

महापालिकेपुढे ९०० कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट
Published on

९०० कोटींच्या करवसुलीसाठी धावपळ
महापालिकेपुढे एकाच दिवशी १४ कोटींचा कर जमा
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निर्धारित ९०० कोटी रुपयांचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पाच दिवस शिल्लक असताना पालिकेने थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, एकाच दिवशी १४ कोटींचा कर जमा करण्यात यश मिळवले आहे.
महापालिका निवडणुकांमुळे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. परिणामी मालमत्ता करवसुलीच्या प्रक्रियेकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा म्हणून पालिकेच्या वतीने ऑनलाइन सुविधा यांसह सुट्टीच्या दिवसांतही विविध कार्यालयांमध्ये मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मालमत्ता करावर सूट देत अभय योजना पालिकेने राबवली आहे. दरम्यान, अनेक मोठे मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने महसुलात घट पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे गरजेचे असून, प्रत्येक मालमत्ताधारकाने अभय योजनेचा लाभ घेऊन आपले कर भरण्याचे कर्तव्य वेळेत पार पाडावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

मालमत्ता जप्तीसाठी थेट धडक
शहरातील अनेक बड्या मालमत्ताधारकांकडे लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्याची यादीही महापालिकेने तयार केली आहे आणि आतापर्यंत महापालिकेने २,५०० थकीत मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानुसार बुधवारी (ता. २५) एकाच दिवशी १४ कोटींचा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. एकूण ५८ कोटींचा महसूल मिळाला असून, उर्वरित थकबाकीधारकांविरोधात पालिकेने कडक पावले उचलली आहेत. मालमत्ता विभागातर्फे अशा कर थकबाकीदारांना थेट जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

डिजिटल माध्यमातून भरण्यास पसंती
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आतापर्यंत तब्बल ७५४ कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली करण्यात आली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे डिजिटल माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन लाख ५४ हजार करदात्यांपैकी दोन लाख १४ हजार करदात्यांकडून ७५४.८३ कोटी जमा झाले आहेत. यापैकी डिजिटल पद्धतीने ४४२.५० कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

२०२५-२६साठी उद्दिष्ट : ९०० कोटी रुपये
एकूण वसुली : ७५४.८३ कोटी रुपये
डिजिटल भरणा : ४४२.५० कोटी रुपये
ऑफलाइन भरणा : ३१२ कोटी रुपये
करदाते ः ३ लाख ५४ हजारांपैकी २ लाख १४ हजार नागरिकांनी कर भरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com