एमआयडीसी मध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

एमआयडीसी मध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
Published on

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
दिघा-यादवनगर मार्गावर तासनतास वाहनांच्या रांगा
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. गवतेवाडी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या बेशिस्त आणि अनधिकृत पार्किंगमुळे गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होत असून, याचा फटका हजारो कामगारांना बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर तासनतास वाहनांच्या रांगा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
नवी मुंबई टीटीसी औद्योगिक क्षेत्रामधील दिघा येथून यादवनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गवतेवाडी परिसरात पार्किंगसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने वाहनचालक थेट रस्त्यावरच गाड्या उभ्या करीत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एमआयडीसी परिसरात हजारो कर्मचारी दररोज या मार्गावरून प्रवास करीत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत वाहन पार्किंग केल्यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद झाला असून, गर्दीच्या वेळेत वाहतूक संथ होते. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांकडून नियमित कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकाने व्यक्त केली.

आपत्कालीन सेवांनाही अडथळा
बेशिस्त पार्किंगमुळे केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर आपत्कालीन सेवांनाही फटका बसत आहे. तर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज याच समस्येला सामोरे जावे लागते. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक वाहनचालकांनी केली आहे. या परिसरात नो पार्किंग झोन घोषित करून कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

उपाययोजना करण्यात येईल
वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्याशी संपर्क साधला असता, या परिसरांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com