पेशवेकालीन प्रशासनाचा ठेवा

पेशवेकालीन प्रशासनाचा ठेवा
Published on

पेशवेकालीन प्रशासनाचा ठेवा
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

वसई, ता. २८ (बातमीदार) ः नोकरीला लागण्याच्या अगोदर पुस्तक लिहिण्याची संकल्पना होती; मात्र कामामुळे वेळ मिळाला नाही. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्याचा आनंद माझ्यापेक्षा कुटुंबीयांना असल्याचे प्रतिपादन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले.
वसई-विरार शहर महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी लिखित ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ पुस्तकाचे डिंपल प्रकाशनने वसईत केले. या वेळी आदिवासी आढावा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विवेक पंडित, ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, आमदार स्नेहा दुबे, महापौर अजीव पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पुस्तकाचे लिखाण, प्रकाशनाचा संपूर्ण प्रवास थोडक्यात व्यक्त करताना आयुक्त सूर्यवंशी यांनी मराठी भाषा आपली परंपरा आहे, तिचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले. तसेच पेशवेकालीन प्रशासनाचा आढावा पुस्तकातून घेतला आहे. त्या काळात लिहिलेली शंभर पत्रे यात संकलित असल्याचे सांगितले. या वेळी विवेक पंडित यांच्या प्रोत्साहनामुळे प्रकाशन शक्य झाले. त्यांनी सतत पाठपुरावा केल्याचे आयुक्तांनी आवर्जून सांगितले. या वेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या पत्नी, कन्यादेखील उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com