

तृतीयपंथींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे तृतीयपंथी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व अन्नधान्य वाटप शिबिर पार पडले. या उपक्रमात टीबी, एचआयव्ही यांसह विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. तसेच आयुष्मान व आभा कार्ड नोंदणीसाठी आशा सेविकांनी मार्गदर्शन केले. फोर्टिस हॉस्पिटल आणि वूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात तृतीयपंथींना मानसिक आरोग्याबाबत समुपदेशनही करण्यात आले.
या वेळी महापालिका उपायुक्त कांचन गायकवाड, शिक्षण समिती सदस्य प्रतीक पेणकर, जतीन प्रजापती, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, समाजविकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका मीनाक्षी उज्जैनकर व तृतीयपंथी समुदायाचे सदस्य सिमरन केणे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.