

नवी मुंबईत प्रदूषणाविरुद्ध १८ महिन्यांचा कृती आराखडा
सभागृह नेते सागर नाईक यांची प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सभागृह नेते सागर नाईक यांनी पुढाकार घेत १८ महिन्यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सागर नाईक यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत शहरातील वायू गुणवत्तेचे नियमित निरीक्षण, प्रदूषणाचे प्रमुख स्रोत शोधणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
या आराखड्यामध्ये शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी साचलेली धूळ पूर्णपणे हटवणे, बांधकाम व वाहतूक क्षेत्रातून होणारे प्रदूषण नियंत्रित करणे, औद्योगिक व रासायनिक प्रदूषणावर लक्ष ठेवणे यांसारख्या उपायांचा समावेश आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरात प्रभावी पर्यावरण नियंत्रण प्रणाली उभारण्यावरही भर देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वायू गुणवत्ता सुधारणा आणि शहरातील धूळ पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने हा १८ महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सागर नाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.