

मेट्रो कारशेडवर व्यावसायिक इमारती
‘एमएमआरडीए’ तपासणार व्यवहार्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील जागांचे दर गगनाला भिडलेले असताना ‘एमएमआरडीए’ आता आपल्या मेट्रो डेपोच्या छतावर व्यावसायिक इमारती उभारण्याचा विचारात आहे; मात्र अशा प्रकारच्या इमारती उभारणे फायदेशीर ठरेल का, त्याला कसा प्रतिसाद मिळेल की नाही, या द्विधा मनःस्थितीत एमएमआरडीए प्रशासन आहे. त्यामुळे याबाबतची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात एमएमआरडीएकडून तब्बल ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कारशेड उभारावी लागणार असून त्याला मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. दरम्यान, मेट्रोसह वेगवेगळे प्रकल्प उभारण्यासाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून तो कर्ज रूपाने उभारावा लागतो; मात्र केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून या कर्जाची परतफेड शक्य नाही. त्यामुळे मेट्रोसाठी उभारल्या जाणाऱ्या कारशेडच्या छतावर व्यावसायिक इमारती उभारून किंवा त्याचा व्यावसायिक वापर करून निधी उभारता येईल का, याबाबत एमएमआरडीएची चाचपणी सुरू आहे; मात्र अशाप्रकारे व्यावसायिक इमारती उभारल्यास त्याला प्रतिसाद मिळेल का, हा प्रश्न उभा राहत असल्याने एमएमआरडीए त्याबाबत आधी अभ्यास करणार आहे. त्यानंतरच व्यावसायिक इमारती उभारण्याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.