पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्पाच्या करारपत्राचे म्हाडाकडून घरोघर वाटप

पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्पाच्या करारपत्राचे म्हाडाकडून घरोघर वाटप
Published on

पीएमजीपी प्रकल्पाच्या
करारपत्राचे घरोघरी वाटप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी म्हाडाने रहिवाशांसोबत कायमस्वरूपी पर्यायी घरांचा करारनामा (पर्मनंट अकोमोडेशन अल्टर्नेट ग्रीमेंट) केला जाणार आहे. त्याला रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या करारपत्राची प्रत म्हाडाकडून घरोघर वाटप केले जात आहे. त्यामुळे हा करारनामा पूर्णत्वास जाणार का, हा प्रश्न आहे.

जोगेश्वरी-पूनमनगर येथील पीएमजीपी वसाहतीत चार मजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी असे ९८४ गाळे आहेत. संरचनात्मक अहवालानुसार सध्या या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहतीचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. रहिवाशांना प्रत्येकी ४५० चौरस फुटांची सुसज्ज सदनिका मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने पुनर्विकासानंतर दिल्या जाणाऱ्या सदनिकेबाबत म्हाडा आणि रहिवाशांसोबत पीएएए करार केला जाणार आहे. त्यानुसार या कराराची प्रत देण्यासाठी म्हाडा कर्मचाऱ्यांनी वसाहतीत कार्यालय सुरू केले आहे. करारनामा घेण्यासाठी रहिवासी उत्सुक नसल्याने म्हाडाकडून प्रत्येक रहिवाशाच्या घरी जाऊन करारनामाची प्रत वाटप केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com