

मलजल वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी २६ कोटींचा खर्च
मुंबई, ता. २८ : मुंबईतील २२ किलोमीटर लांब ६०० मिलीमीटरपेक्षा अधिक व्यासाच्या मलजल वाहिन्यांची मॅन्युअल (कामगारांमार्फत) आणि तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २६ कोटी ७० लाख ३४ हजार रुपये खर्च करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई महानगरामध्ये सुमारे दोन हजार २६ किलोमीटर लांबीचे मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे आहे. यातील काही ठिकाणच्या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मलजल वाहिन्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलजलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवणे, तुंबणे आणि पाणी साचण्याच्या समस्या टाळणे तसेच आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे काढून टाकल्याने पावसाळ्यातील पाणी निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.