

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल
भिवंडी, ता. २८ (वार्ताहर)ः एका १८ वर्षीय तरुणाने १४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथे घडली.
अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अत्याचारी तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शेजारी राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. त्यानंतरदेखील आरोपीने पीडितेवर दोन ते तीन वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी युवकाच्या विरोधात पोक्सोसह विविध कलमांन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.