

भिवंडीत गॅस लायटर कंपनीला आग
भिवंडी, ता. २८ (वार्ताहर)ः भिवंडी तालुक्यातील पडघा-कल्याण रस्त्यावरील सापे ग्रामपंचायत हद्दीत आग लागल्याची घटना घडली. वायपीएम मॅन्युफॅक्चर गॅस लायटर कंपनीला ही आग शनिवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर गॅस लायटर बनविण्याचे काम सुरू होते. कंपनीत ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर होता. गॅस लायटरचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या.
आग लागल्याची माहिती मिळाल्यावर भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन अधिकाऱ्यांनी तसेच खासगी पाण्याच्या टँकरच्या मदतीने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पाच ते सहा तास लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वेळी कंपनीत काम करणारे कर्मचारी अगोदरच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.