

मोटार विमा क्षेत्रात ‘नावी’चा प्रवेश
मुंबई, ता. २८ : डिजिटल वित्तीय सेवा मंच ‘नावी’तर्फे मोटार विमा सेवेची घोषणा केली असून, शून्य कमिशन पद्धतीने ही कंपनी काम करणार आहे.
पूर्णपणे डिजिटल आणि अॅपआधारित पद्धतीने मोटार विमा खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी करणे हा ‘नावी’चा या सेवेमागील उद्देश आहे. ग्राहक ‘नावी’ अॅपवरून थेट कार आणि दुचाकींसाठी व्यापक, स्वतःसाठी नुकसानकवच म्हणून किंवा तृतीय पक्ष विमा पॉलिसी खरेदी करू शकतात. यात तत्काळ पॉलिसी जारी करणे, पारदर्शक किंमत निर्धारण आणि शून्य कमिशन यांचा समावेश आहे. एजंट आणि विक्रेताआधारित वितरण पद्धतीत मोटार विमा पॉलिसींमध्ये अनेकदा मध्यस्थांचे कमिशन समाविष्ट असते. त्यामुळे एकूण खर्च वाढतो. ‘नावी’ची थेट ग्राहक पद्धत ही सर्व कमिशन पूर्णपणे काढून टाकते. त्यामुळे कंपनीला खर्चातील बचत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते आणि अधिक सोपा व पारदर्शक खरेदी अनुभव देता येतो, असे नावी जनरल इन्शुरन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गोयल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.