भटक्या कुत्र्यांचा वाढता कहर दिघा-ऐरोली-घणसोलीत नागरिक त्रस्त

भटक्या कुत्र्यांचा वाढता कहर दिघा-ऐरोली-घणसोलीत नागरिक त्रस्त
Published on

भटक्या श्वानांचा वाढता कहर
दिघा-ऐरोली-घणसोलीत नागरिक त्रस्त
वाशी, ता. २८ (बातमीदार) ः दिघा, ऐरोली आणि घणसोली परिसरात भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच दिघा येथे भर दिवसा एका लहान मुलाला भटक्या श्वानाने चावा घेतल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येमुळे लहान मुलांना एकटे बाहेर सोडणे धोकादायक ठरत आहे. शासकीय निर्बीजिकरण (स्टेरिलायझेशन) प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी, रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले आहे.
ऐरोली सेक्टर १, २, ३, ४, ५, १६, १७, २०, पटनी कंपनी परिसर, गणपती पाडा, दिघा, एमआयडीसीतील यादव नगर, इळठण पाडा आणि घणसोली व गोठिवली भागात भटक्या श्वानांची संख्या अधिक आहे. रात्रीच्या वेळी या श्वानांच्या टोळ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करतात. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, रात्रीपाळीतील कामगारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे कामगार सागर कांबळे यांनी सांगितले.

सोसायट्यांमध्ये मुक्तपणे वावर
घणसोलीतील सिडको वसाहतींमध्येही सोसायट्यांमध्ये मुक्तपणे वावरताना दिसतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील विविध भागांत दर महिन्याला सरासरी ५० ते ६० श्वानांच्या चाव्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे.

पालिका आयुक्तांना निवेदन देणार
दिघा परिसरात रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी. यासंदर्भात लवकरच पालिका आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहोत, अशी माहिती नगरसेविका ॲड. श्वेता काळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com