

चेंबूरमध्ये डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
चेंबूर, ता. २८ (बातमीदार) : भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात चेंबूर कॅम्प येथील सनातन हायस्कूलकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. यामध्ये लक्ष्मी मंगेश नांदगावकर (३५) यांचा मृत्यू झाला. त्या चेंबूर येथील ब्लिंकिट कंपनीत रायडर म्हणून कार्यरत होत्या. त्या माहुल परिसरातील व्हिडिओकॉन वसाहतीत वास्तव्यास होत्या. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. २७) दुपारी ४.४० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लक्ष्मी नांदगावकर या आपल्या दुचाकीवरून चेंबूर कॅम्प मार्गावरून जात असताना, त्या मार्गावरून जाणाऱ्या भरधाव डम्परने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, फरार आरोपी डम्परचालक अमन राम दरश याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.