

पोलिसांच्या हातावर तुरी
ठाण्यात गुन्हे सिद्धतेचा दर २५ टक्क्यांच्या खाली
ठाणे, ता. २९ : आयुक्तालयाअंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या सिद्धतेचा दर २५ टक्क्यांच्या खाली आहे. २०२५च्या आकडेवारीनुसार सत्र न्यायालयात २१ टक्के, तर जेएमएफसी न्यायालयात १८ टक्के गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात ठाणे पोलिस अपयशी ठरले आहेत.
सत्र न्यायालयात साधारणपणे खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा तसेच खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी चालते. पण न्यायालयात निर्दोष सुटकेचे प्रमाण ६० टक्के आहे. २२ खटले परस्पर सामोपचाराने किंवा समझोत्याने निकाली काढले. तर २४ खटल्यांमध्ये आरोपींचा मृत्यू झाल्यामुळे किंवा तांत्रिक कारणाने खटल्याची कार्यवाही थांबवली. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या १०० पैकी फक्त २१ प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा होत आहे.
--------------------------------
सत्र न्यायालयात ः गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणीचे वर्षभरात २,५८४ खटले सुनावणीच्या विविध टप्प्यांवर होते. मात्र फक्त १४३ खटल्यांमध्ये आरोप सिद्ध झाले असून, न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर ४०७ खटल्यांमध्ये पुराव्याअभावी किंवा इतर कारणांमुळे आरोपींची निर्दोष सुटका झाली.
कनिष्ठ न्यायालय ः गुन्हे सिद्धतेचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत आहे. २०२४मध्ये ७९ टक्के समाधानकारक होते. २०२५मध्ये १८,३६५ खटल्यांपैकी ५,०९४ खटल्यांचा निकाल लागला. केवळ ८९४ प्रकरणांत आरोपी दोषी आढळले, तर १,१६३ प्रकरणांत निर्दोष सुटका झाली.
--------------------------
आरोपी सुटण्याची कारणे
- खटला दीर्घकाळ चालल्यामुळे
- तांत्रिक पुराव्यांचा अभाव
- भीतीपोटी प्रत्यक्षदर्शींचा साक्ष देण्यास नकार
- परिस्थितीजन्य पुराव्यांमध्ये सुसूत्रता नसल्याचा फायदा
----------------------
पाच वर्षांची तुलनात्मक आकडेवारी
वर्ष एकूण निकाल गुन्हे सिद्ध (दोषी) निर्दोष सुटका टक्केवारी
२०२१ १४६ ४५ १०१ ३१
२०२२ २३५ ६१ १७४ २६
२०२३ ३१८ १०७ २११ ३४
२०२४ ७७५ ११३ ६२२ १५
२०२५ ६७७ १४३ ५३४ २१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.