गरुडझेप फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

गरुडझेप फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर
Published on

गरुडझेप फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर
६० रक्तदात्यांकडून रक्तसंकलन
रोहा, ता.२९ (बातमीदार) : रोह्यातील गरुडझेप फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. समाजकारणाला प्राधान्य या विचारधारेवर आधारित हा उपक्रम गेली १३ वर्षे सातत्याने राबवला जात आहे.
या शिबिराचे उद्‍घाटन प्रसंगी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी रोहे शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, शहर प्रमुख राजेश काफरे, तालुका प्रमुख नितीन वारंगे, उप तालुका प्रमुख सचिन फुलारे, वरसे ग्रा.पं.माजी सरपंच अमित मोहिते, काँग्रेस शहर अध्यक्ष विनोद सांवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. गरुड झेप फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले व भविष्यातही असे सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे यतीन धुमाळ, दिप्रेश सावंत, दत्ता साळुंखे, प्रणय मोहिते, कैलास पाटील, राजकुमार विश्वकर्मा, शंकर मिलगीरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : गरुडझेप फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी उपस्थित मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com