पिंपळासमध्ये १२.५ लाखांची घरफोडी

पिंपळासमध्ये १२.५ लाखांची घरफोडी
Published on

वज्रेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावात १२.५ लाखांची घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. ओळखीच्या व्यक्तींनी संगनमत करून चोरी केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू दत्तू सुतार (वय ५३) हे हनुमान मंदिराजवळ कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात २७ मार्चला सायंकाळी ७.५६ ते ८.३९ या वेळेत चोरीची घटना घडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली एकूण १३ लाख रुपयांपैकी १२ लाख ५० हजार रुपये चोरीस गेले. या प्रकरणात संशयित म्हणून एका दाम्पत्याचे नावे पुढे आले आहेत. घटनेदरम्यान संशयित दाम्पत्याने फिर्यादींची पत्नी छाया सुतार आणि मुलगी समीधा यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्याचवेळी हॉलमध्ये बसलेल्या संशयित महिलेच्या नवऱ्याने फ्रिजवरील कपाटाची चावी घेतली आणि बेडरूममधील कपाटातून १३ लाख रुपयांपैकी १२.५ लाख रुपये चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही चोरी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने केल्याने घरातील सदस्यांना सुरुवातीला याचा संशयही आला नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे करत आहेत. घटनेनंतर पिंपळास परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओळखीच्या व्यक्तींनीच चोरी केल्यामुळे नागरिक अधिक सतर्क झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com