७५ टक्के आरोपी ‘निर्दोष’

७५ टक्के आरोपी ‘निर्दोष’
Published on

७५ टक्के आरोपी न्यायालयात ‘निर्दोष’
दोष सिद्धतेचा दर २१ टक्क्यांवर, ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः भुरट्या चोरांपासून सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांची कामगिरी दिवसेंदिवस खालावत आहे. वर्षभरामध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात २१ टक्के तर न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्गामध्ये हजर केलेल्या आरोपींपैकी केवळ १८ टक्के आरोपींवरचे दोषारोप सिद्ध करण्यात यश आले आहे. त्यामुळे बेड्या ठोकलेले ७५ टक्के आरोपी ‘निर्दोष’ सुटत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
मुंबईलगत वेगाने विकसित होणारे ठाणे शहर लोकसंख्या, बांधकाम, उद्योगवाढीने झपाट्याने विस्तारले आहे; मात्र नागरीकरणाबरोबर गुन्हेगारीचे सावटही गडद होत गेले आहे. घरफोड्या, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे जाळे तसेच खून, हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. काही वर्षांचा आढावा घेतला असता गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून तपासाअंती उकल करण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही खालावले आहे. त्यातही आरोपी अटक करण्याचे प्रमाणही घसरत आहे. खून, बलात्कार गुन्ह्यांमध्ये अटक आरोपींचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे; पण आर्थिक फसवणूक प्रकरणातील ‘दरोडेखोर’ पोलिसांच्या हाताबाहेर असल्याचे दिसते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
-----------------------------------
सत्र न्यायालयात ः गुन्हे सिद्धतेचे प्रमाण २१ टक्क्यांपर्यंत आहे. गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणीचे वर्षभरात २,५८४ खटले सुनावणीच्या होते; मात्र १४३ खटल्यांमध्ये आरोप सिद्ध झाले असून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर ४०७ खटल्यांमध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष सुटका झाली.
कनिष्ठ न्यायालय ः गुन्हे सिद्धतेचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत आहे. २०२४ मध्ये ७९ टक्के समाधानकारक होते. २०२५ मध्ये १८,३६५ खटल्यांपैकी ५,०९४ खटल्यांचा निकाल लागला. केवळ ८९४ प्रकरणांत आरोपी दोषी आढळले, तर १,१६३ प्रकरणांत निर्दोष सुटका झाली.
--------------------------
तपासातील त्रुटींचा फटका
- तपासात प्राथमिक पातळीवरच चुका
- पुरावे गोळा करण्यात चालढकल
- साक्षीदार ऐनवेळी फितूर होणे
- साक्षीदार संरक्षण यंत्रणेचा अभाव
- दीर्घकाळ चालणारे खटले
----------------------
पाच वर्षांची तुलनात्मक आकडेवारी
वर्ष एकूण निकाल गुन्हे सिद्ध (दोषी) निर्दोष सुटका
२०२१ १४६ ४५ १०१ ३१
२०२२ २३५ ६१ १७४ २६
२०२३ ३१८ १०७ २११ ३४
२०२४ ७७५ ११३ ६२२ १५
२०२५ ६७७ १४३ ५३४ २१
-----------------------------
पोलिस काय म्हणतात..?
एखाद्या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटल्यास त्या प्रकरणाचा आढावा घेतला जातो. विश्लेषण केले जाते. कोणत्या बाबी कमी राहिल्या. आणखी कोणत्या पद्धतीने तपास करता आला असता याचा आढावा घेतला जातो, असा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com