

कामचुकार कंत्राटदारांवर नगरपरिषदेचे लक्ष
श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचे कारवाईचे संकेत
श्रीवर्धन, ता. २८ (वार्ताहर) : शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असून यासाठी बेजबाबदार कंत्राटदारांना नागरिक जबाबदार धरत आहेत. पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही कामांचा वेग मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शहरातील अनेक मार्गांवरील रस्ते व गटारांची दुरवस्था लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या विकासकामांचा वेग मंदावला असून अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाढती रहदारी लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, ढासळलेल्या गटारांची दुरुस्ती, गटारांवर काँक्रिट स्लॅब बसविणे तसेच पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना अशी विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, श्रीवर्धन तालुक्याबाहेरील कंत्राटदारांनी ठेका घेऊन काम पोटठेकेदारांकडे दिल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीराम मंदिराकडे जाणारा रस्ता कच्चा स्वरूपातील आहे.मंदिराच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कंत्राट तालुक्या बाहेरील कंत्राटदाराने घेतले आहे. कामाची मुदत संपूनही कालावधी लोटला. परंतु , एकही पेव्हर ब्लॉक या रस्त्यावर बसवण्यात आला नाही.
प्रतिक्रिया. :-
श्रीवर्धन नगर परिषद हद्दीत जी कामे कंत्राटदाराने अपूर्ण ठेवलेली आहेत किंवा ज्या कामांची मुदत संपलेली आहे तसेच जी कामे निकृष्ट दर्जाची आहेत त्या सर्व कंत्राटदारांना कायदेशीर नोटीस काढण्यात येतील. झालेल्या प्रकाराचा जाब विचारण्यात येईल व जे काही स्टेटमेंट असेल ते लेखी स्वरूपात त्यांचे कडून घेण्यात येईल. कंत्राटदार दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल.
:- अतुल चौगुले. नगराध्यक्ष. श्रीवर्धन नगरपरिषद.
(फोटो - अतुल चौगुले आणि अपुर्ण अवस्थेतील शहरातील रस्ते व खोदकाम केलेली गटारे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.