मिरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता

मिरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता
Published on

मिरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे ३ एप्रिलला लोकार्पण

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर मेट्रोच्या बहुप्रतीक्षित पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ३ एप्रिलला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार असल्याने मिरा-भाईंदरकरांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्यात काशिगाव ते दहिसर मार्ग सुरू होणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये लोकार्पण होणार होते; मात्र मेट्रो मार्गाचे अर्धवट राहिलेले काम तसेच सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यास झालेला विलंबामुळे लोकार्पण लांबणीवर पडले. काही दिवसांपूर्वीच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मेट्रो मार्गाची पाहणी केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो धावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ३ एप्रिलला सुरुवात होत आहे.
--------------------------------
अंधेरी पश्चिमपर्यंत सेवा
- मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची मार्गिका ४.४ किमी लांबीची असून मेट्रो मार्गिका नऊ ठाणे जिल्ह्यातील पहिला मेट्रो कॉरिडॉर आहे. पश्चिम द्रुतगतीवरील मेट्रो मार्गिका सातला जोडण्याच्या दृष्टीने दहिसर येथे एक महत्त्वाची इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणार आहे.
- मेट्रो मार्गामध्ये दहिसर, पांडुरंगवाडी, मिरागाव, काशीगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान यांचा समावेश असून प्रवाशांना थेट अंधेरी पश्चिमपर्यंत जाता येणार आहे.
-------------------------
मिरा-भाईंदरहून मेट्रोने थेट अंधेरीपर्यंत जाता येईल. मिरा-भाईंदरमधील मेट्रोचा काशिगाव ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com