

कारच्या काचा फोडून चोरी करणारी टोळी गजाआड
खारघर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : खारघरमधील इस्कॉन मंदिर परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील मुख्य सूत्रधाराला नुकतीच रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे केवळ खारघरच नव्हे, तर सीबीडी, पनवेल, शिळ डायघर आणि मिरा-भाईंदरमधील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
खारघरमधील इस्कॉन मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कारच्या काचा फोडून आतील मौल्यवान ऐवज लंपास करण्याचे प्रमाण वाढले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या सखोल तपास केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचत रझा उर्फ रझाक इसरार खा या आरोपीला रंगेहाथ पकडले.
रझाक हा कल्याण परिसरातील गोवेली येथील रहिवासी असून, तो पान विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्यावर यापूर्वी मानपाडा आणि सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या रझाकने नवी मुंबईत सात गुन्हे कबूल केले आहेत. आरोपीकडून चोरीच्या अनेक पर्स, विविध बँकांचे कार्डे, मोबाईल आणि लॅपटॉपचे चार्जर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात संजय रॉय हा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.