रिक्षाला ट्रेलरने मागून दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

रिक्षाला ट्रेलरने  मागून दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
Published on

ट्रेलरच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
उरण, ता. २८ (बातमीदार) ः न्हावा-शेवा पोलिस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाच्या सिग्नलवर गुरुवारी (ता. २६) रात्री भीषण अपघात घडला. सिग्नलवर उभ्या असलेल्या रिक्षाला एका कंटेनर ट्रेलरने मागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून किसन ठाकूर (वय ५६) असे त्यांचे नाव आहे.
किसन ठाकूर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या रिक्षाने जात होते. उड्डाणपुलाच्या उतरणीला असलेल्या सिग्नलवर ते एका ट्रेलरमागे रिक्षा थांबवून सिग्नल सुरू होण्याची वाट पाहत होते. यावेळी मागून येणाऱ्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन ट्रेलरमध्ये रिक्षा चिरडली गेली. अपघाताची माहिती मिळताच न्हावा-शेवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढत उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर ट्रेलरचालक काजू राजभर घटनास्थळावरून फरार झाला आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com