कुर्ला स्थानकातील बाळ स्तनपान केंद्र बंद

कुर्ला स्थानकातील बाळ स्तनपान केंद्र बंद
Published on

कुर्ला स्थानकातील स्तनपान केंद्र बंद

धारावी, ता. २९ (बातमीदार) : रेल्वेने लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या मातांना अनेकदा फलाटावर स्तनपान करणे कठीण जाते. याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने मुंबईतील अनेक फलाटांवर बाळ स्तनपान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक १वर मातांसाठी बाळ स्तनपान केंद्र उभारण्यात आले असून, हे केंद्र बंद असल्याने अनेक स्तनदा मातांना त्याचा वापर करता येत नाही. यामुळे अनेक महिला प्रवाशांनी संतापही व्यक्त केला आहे.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलने लाखो प्रवासी दररोज कसारा, कर्जत, पनवेल येथे कुर्ला स्थानकातून प्रवास करतात. या वेळी अनेक स्तनदा मातांचा या प्रवासात समावेश असतो. त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक वेळा लहान बाळांना भूक लागते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने अशा मातांसाठी कुर्ल्यातील फलाट क्रमांक १वर स्तनपान केंद्र उभारले आहे. दरम्यान, काही कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून हे केंद्र बंद असल्याने त्याचा वापर स्तनदा मातांना करणे कठीण झाले आहे.
रेल्वे प्रशासनाला जर खरंच स्तनदा मातांचा सहकार्य करण्याची इच्छा असेल, तर फक्त कुर्लाच नाही तर विविध रेल्वे स्थानकांवरील स्तनपान केंद्रे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.

फोटोओळ - धारावी : कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक १वरील बाळ स्तनपान केंद्र बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com