

गॅस एजन्सीकडून सिलेंडरची साठेबाजी
माजी विरोधी पक्ष नेते नामदेव भगत यांचे आयुक्तांना निवेदन
नेरूळ, ता.२९ (बातमीदार)ः नवी मुंबई परिसरातील काही एलपीजी गॅस एजन्सीकडून नागरिकांना सिलेंडरचा पुरवठा जाणीवपूर्वक थांबविण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंब, तसेच लहान हॉटेल व्यवसाय यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते नामदेव भगत यांनी म्हटले आहे.
काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून अधिक दराने सिलेंडर विक्री केल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही बाब ग्राहक हक्कांचे उल्लंघन करणारी असून आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम करणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित दोषी गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांना नियमित आणि सुरळीत गॅस पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.