

करळ इंटरचेंजखाली अनधिकृत झोपड्यांचा विळखा
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
उरण, ता. २९ (बातमीदार) : कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या करळ इंटरचेंज उड्डाणपुलाखाली सध्या अनधिकृत झोपड्यांनी मोठे बस्तान बसविल्याने परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून महामार्गावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवघर फाट्याजवळ राष्ट्रीय मार्गालगत वाढलेल्या या अतिक्रमणाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेएनपीएतर्फे उभारण्यात आलेला फुलपाखराच्या आकाराचा इंटरचेंज उड्डाणपूल हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. पुलाभोवती लाखो रुपये खर्चून सुशोभीकरण व बाग विकासाची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पालाच आता अनधिकृत झोपड्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, उड्डाणपुलाच्या सर्व बाजूंनी झोपडपट्टीसदृश वसाहती उभारण्यात आल्या असून येथे विविध अवैध धंदे सुरू असल्याचीही चर्चा आहे. पुलाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग व्यवसाय फोफावला असून शेकडो कंटेनर ट्रेलर पार्क करून त्यांच्याकडून शुल्क आकारले जात असल्याचे समोर येत आहे. सिडको, जेएनपीए प्रशासन तसेच स्थानिक पोलीस यंत्रणा या अतिक्रमणाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.