डीडीएसआर बिल्डर कडून कोणतीही फसवणूक नाही”

डीडीएसआर बिल्डर कडून कोणतीही फसवणूक नाही”
Published on

डीडीएसआर बिल्डरकडून फसवणूक नाही
खासदार श्रीरंग बारणे यांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण

पनवेल, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबई, पनवेल परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी डीडीएसआर समूहाच्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली आहे. खारघर येथे खासदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मातोश्री’ सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. डीडीएसआरने कोणत्याही प्रकारची फसवणूक, दिरंगाई किंवा आर्थिक गैरव्यवहार केलेला नसल्याचे बारणे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून डीडीएसआर समूहावर होत असलेल्या आरोपांमुळे गृहनिर्माण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला असून बारणे यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. डीडीएसआर बिल्डरच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळलेली नाही. कंपनीने सर्व प्रकल्प नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवले आहेत, असे त्यांनी नमूद केले. डीडीएसआर ही कंपनी मराठी उद्योजकांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने उभी केली आहे. अशा संस्थेवर होणारे आरोप हे निराधार असून त्यामागे अन्य हेतू असू शकतात. राहुल हजारे आणि त्यांच्या टीमने प्रामाणिकपणे काम करत अनेक कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिली आहेत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, कोणत्याही प्रकारची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल आणि कंपनीवरील सर्व आरोप खोटे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या व्हिडिओमुळे डीडीएसआर समूहाला राजकीय पातळीवरही पाठबळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com