

उरण एसटी डेपोमध्ये एसटीविषयी जनजागृती कार्यक्रम
उरण, ता. २८ (बातमीदार) : उरण एसटी डेपोमध्ये ‘एसटी विषयी आस्था आणि एसटी महामंडळाची व्यवस्था’ या विषयावर कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील व जेएनपीए अधिकारी महादेव घरत उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. पाटील यांनी सांगितले की, ‘लालपरी’ एसटी ही ग्रामीण व शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी असून नागरिकांमध्ये तिच्याविषयी आपुलकीची भावना कायम आहे. खेडोपाड्यांपर्यंत सेवा देत एसटीने नातेसंबंध जपले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेपो व्यवस्थापक गद्रे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्याबद्दल महादेव घरत यांचा सत्कार करण्यात आला. धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नशाबंदीविषयी प्रचारक लवेंद्र मोकल, आदर्श शिक्षक संजीव पाटील व मच्छिंद्र घरत यांनी तंबाखूविरोधी मार्गदर्शन केले. हिंदी कवयित्री अनामिका राम यांनी ‘लाल परी’ कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले.
यावेळी विषयानुरूप शासनमान्य नशाबंदी विरोधात प्रचारक लवेंद्र मोकल यांनी माझी एसटी, संजीव पाटील यांनी घातक नशा तंबाखूची, मच्छिंद्र घरत यांनी अभ्यासपूर्ण तंबाखूवर व्याख्यान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.