रोह्यातील कळसगिरीसह अन्य डोंगर आगीच्या विळख्यात

रोह्यातील कळसगिरीसह अन्य डोंगर आगीच्या विळख्यात
Published on

रोह्यातील कळसगिरीसह अन्य डोंगर आगीच्या विळख्यात
वन विभागाकडे अपुरी साधनसामुग्री
रोहा ता.२९ (बातमीदार) ः तालुक्यात वणव्याने उग्ररूप धारण केले असून कळसगिरी डोंगरसह अन्य डोंगर आगीच्या विळख्यात सापडले आहेत. २५ मार्चपासून सुरू झालेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून तिचा फैलाव आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या आगीमुळे निसर्गसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. कळसगिरी डोंगर गेल्या तीन दिवसांपासून जळत असून या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असली तरी आग विझवण्यासाठी केवळ एकच ‘एअर ब्लोअर’ मशीन उपलब्ध असल्याने परिस्थिती हाताळणे कठीण ठरत आहे.
दरम्यान, कळसगिरी डोंगरा वरील आग रौद्ररूप धारण करत भुवनेश्वरपर्यंत पोहोचली होती. भुवनेश्वर येथील डोंगर रात्रभर जळत होते. तर दुसरीकडे पिंगळसई, मालसाई, वरवटणे, पाले, भातसई, मेढा परिसर व ऐतिहासिक अवचितगड परिसरातील डोंगरही आगीच्या तडाख्यात सापडले आहेत. पिंगळसई गावाजवळील डोंगर जळतानाचे दृश्य संपूर्ण रोहा शहरातून दिसत होते.ज्यामुळे नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली.
वनव्याची तीव्रता लक्षात घेता केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता रोह्यातील तरुण आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. देवकान्हे, बाहे व कळसगिरी परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन कर्मचारी आणि स्थानिक तरुणांनी रात्रभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, जोरदार वारे आणि प्रचंड उष्णतेमुळे आग वारंवार भडकत असल्याचे दिसून आले. वणवे नैसर्गिक कारणांनी लागतात की मानवनिर्मित आहेत, याचा सखोल तपास करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

कोट :
या घटनेची माहिती समजताच स्थानिक कार्यकर्ते व वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता जास्त असल्याने लवकर आटोक्यात येणे शक्य होत नाही. वणवे लागू नये या संदर्भात गावा गवात जनजागृती मोहिम सुरु आहे. स्थानिक मंडळी देखील सहकार्य करत आहेत.
महेंद्र दबडे,
आरएफओ , रोहा वन विभाग..

फोटो कॅप्शन : कळसगिरी डोंगरावर भडकेल्या अगीच्या वणव्यात डोंगर अक्षरशः जळून खाक झाले आहेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com