उल्हासनगरमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी नवे प्रस्ताव

उल्हासनगरमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी नवे प्रस्ताव
Published on

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : उल्हासनगरमधील वाढत्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. व्यापारी, ट्रान्स्पोर्ट आणि रिक्षा संघटनांच्या सहभागामुळे ही बैठक केवळ चर्चा न राहता ठोस उपाययोजनांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरली.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शनिवारी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने बैठक झाली. या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ, अधिकारी नाना आव्हाड यांच्यासह वाहतूक विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी व्यापारी असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, वाहतूक सल्लागार समिती; तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील वाढती वाहतूक, अव्यवस्थित पार्किंग, अरुंद रस्ते आणि वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सर्व प्रतिनिधींनी मते मांडली. बैठकीत कल्याण-बदलापूर मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरली.

जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड वाहने ठराविक वेळेतच शहरात प्रवेश करू देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. वाहतूक पोलिस विभागाने सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आगामी काळात उल्हासनगरची वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com