ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई महापालिकेची झेप राज्यात चौथा क्रमांक!

ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई महापालिकेची झेप  राज्यात चौथा क्रमांक!
Published on

ई-गव्हर्नन्समध्ये नवी मुंबई महापालिकेची झेप
राज्यात चौथा क्रमांक ः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
वाशी, ता. २८ (बातमीदार) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी प्रशस्तिपत्र दिले. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मानाचा चौथा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षभरापासून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकडे भर दिला असून जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये नागरिकांना करभरणा, महानगरपालिकेशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून घेणे, सुविधांविषयी तक्रार / सूचना करणे, महानगरपालिकेशी संबंधित माहिती मिळविणे अशा सर्वच बाबींमध्ये वेबसाईट, माय एनएमएमसी ॲप, शासनाच्या आपले सरकार पोर्टलशी संलग्नता, व्हॉट्सॲप चॅटबॉट, डॅशबोर्ड, ई-ऑफिस, एआय, ब्लॉकचेन, जीआयएस आधारित सेवा अशा विविध प्रकारे ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन क्यूसीआय सारख्या त्रयस्थ संस्थेमार्फत १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आले. दरम्यान, १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने चांगली कामगिरी करीत राज्यातील महानगरपालिकांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता.

नवी मुंबई महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पारदर्शकता, नागरिक-केंद्रित सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सातत्याने भर दिल्यामुळे राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात राज्यात चतुर्थ क्रमांकाचे यशस्वी मानांकन महानगरपालिकेने संपादन केले आहे. त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत आगामी काळात महापौर व सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या सूचना व सहकार्य तसेच आयुक्त यांचे मार्गदर्शन आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ, जलद व दर्जेदार सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध डिजीटल माध्यमांचा उपयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहील.
- सुनिल पवार, आतरिक्त आयुक्त नमुंमपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com