

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही, या अफवेने बदलापूरकरांनी सर्व कामे बाजूला ठेवत रविवारी (ता. २९) पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. अनेक ठिकाणी दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दोन दिवस पुरेल असा इंधनसाठा नागरिकांकडून केला जात असल्याने काही तासांतच पेट्रोल संपत आहे. परिणामी, अनेक पेट्रोल पंप एक ते दोन दिवस बंद ठेवण्याची वेळ येत आहे. या परिस्थितीत रणरणत्या उन्हात नागरिक तासन्तास रांगेत उभे राहत आहेत. त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे.
इराण-इस्रायल-अमेरिका या देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात आणीबाणी किंवा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशा अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र केले आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडर साठवण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागली आहे. काही ठिकाणी पंप व गॅस केंद्रांवर वादावादीचे प्रकारही घडत आहेत. काही खासगी पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर वाढल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. देशात ६० दिवस पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अफवांवर नियंत्रण ठेवून इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळपासून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी असते. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, तरी संध्याकाळपर्यंत पेट्रोल संपते. दोन-दोन दिवस पेट्रोल मिळत नाही. पेट्रोल व गॅस बंद होणार, लॉकडाऊन लागणार अशा चर्चांमुळे गोंधळ वाढला आहे.
- मोनिका वाघरे, नागरिक
बदलापूर : पेट्रोल भरण्यासाठी भर उन्हात नागरिक तासन् तास उभे राहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.