

माजी नगरसेवक सिरील डिसोझा यांचे निधन
मालाड, ता. २९ (बातमीदार) ः मालवणीतील माजी अपक्ष नगरसेवक सिरील डिसोझा यांचे आज अल्पशा आजाराने वयाच्या ५७व्या वर्षी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. डिसोझा यांना भाजपच्या पाठिंब्यामुळे एक वर्षासाठी पी उत्तर विभाग प्रभाग समिती अध्यक्षपद मिळाले होते. मालवणीच्या राजकारणात नेहमी सक्रिय भूमिका बजावणारे डिसोझा यांनी कधी अपक्ष, तर कधी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.