

मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाताची भीती
वाणगाव-खळखळा परिसरातील मुख्य रस्त्यालगत धोकादायक परिस्थिती
तारापूर, ता. ३० (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वाणगाव-खळखळा परिसरात मुख्य रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अपघाताची स्थिती असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाणगाव-डहाणू मार्गावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहनांचा समतोल बिघडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, ही माती नेमकी कुठून आणली, कोणत्या उद्देशाने टाकण्यात आली आणि यासाठी जबाबदार कोण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
डहाणू रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, यावरून दररोज कामगार, नोकरदार, व्यावसायिक तसेच मालवाहतूक करणारी हलकी व जड वाहने आणि दुचाकींची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून मातीचा ढीग हटवून रस्ता सुरक्षित करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.