डोंबिवलीत वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा चाप

डोंबिवलीत वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा चाप
Published on

डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांना दणका
भररस्त्यात वाहन उभे केल्याने गुन्हे दाखल; विष्णूनगर पोलिसांची धडक कारवाई
डोंबिवली, ता. ३० : शहरातील मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध विष्णूनगर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वर्दळीच्या महात्मा फुले रोड आणि पंडित दीनदयाळ रोड परिसरात कारवाई करीत पोलिसांनी दोन रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांची वाहने जप्त केली आहेत.

विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पंडित दीनदयाळ रोडवर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून वाहतूक खोळंबणाऱ्या नागेश मोहन करकडे (२४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
महात्मा फुले रोडवर अशाच प्रकारे प्रवासी भरणाऱ्या नीलेश रामभाऊ आंबेकर या चालकावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला रोखून गुन्हा दाखल केला. संबंधित चालकांविरुद्ध सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हवालदार अंकुलवार, भोसले आणि पथकाने ही कामगिरी केली.

वाहतूक पोलिसांचे आवाहन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी केवळ निर्धारित वाहनतळांचाच (रिक्षा स्टँड) वापर करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com