मोकाट जनावरांमुळे मनस्ताप

मोकाट जनावरांमुळे मनस्ताप
Published on

मोकाट जनावरांमुळे मनस्ताप
डहाणू-चारोटी राज्यमार्गावर अपघातांचा धोका
कासा, ता. ३० (बातमीदार)ः डहाणू-नाशिक राज्यमार्गावर डहाणू ते कासा यादरम्यान मोकाट गुरे, भटक्या श्वानांचा वावर असल्याने वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी गुरांचे कळप रस्त्यावरच बसत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
कडक उन्हाळ्यामुळे चारा, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पशुपालकांनी जनावरे मोकाट सोडली आहेत. त्यामुळे खाद्य, पाण्याच्या शोधात गुरे रस्त्यांवर फिरत असतात. दुपारच्या उन्हात सावलीसाठी रस्त्यालगत किंवा मधोमध बसत आहेत. अनेकदा काळ्या रंगाची गुरे सावलीत बसलेली असताना वाहनचालकांना दिसत नाहीत. परिणामी अचानक अपघात घडत आहेत. याशिवाय भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. सध्या या मार्गावर विविध विकासकामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदकामे केली गेली आहेत. त्यातच अवजड मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
--------------------------------
डहाणू ते कासा यादरम्यान अनेक ठिकाणी गुरे झाडांच्या सावलीत बसलेली असतात. त्यामुळे अचानक अपघात घडत आहेत.
- प्रणय घारपुरे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com