

तीसगाव नाक्यावर अस्वच्छता
कल्याणच्या पुणे लिंक रोडवर दुर्गंधी; नागरिक त्रस्त
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील वर्दळीचा भाग असलेल्या तीसगाव नाका आणि पुणे लिंक रोड परिसरात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूगर्भातील मुख्य मैला वाहिनीचे चेंबर वारंवार फुटत असल्याने सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत आहे. विशेष म्हणजे ही गटारगंगा स्थानिक आमदारांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचली असूनही महापालिका प्रशासन ढिम्म आहे.
वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल
मैलावाहिनी वारंवार तुंबत असल्याने चेंबरमधून अशुद्ध पाणी उसळून बाहेर येत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, पुणे लिंक रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना उग्र वासाचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्यामुळे रस्त्यावर चिखल आणि निसरडे वातावरण तयार झाले असून, दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कायमस्वरूपी उपायांची मागणी
प्रशासन दरवेळी केवळ तात्पुरती मलमपट्टी करते. काही दिवसांनंतर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही मैलावाहिनी जुनी झाली असून तिची क्षमता संपली आहे का, याबाबत तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. दरवेळी केवळ चेंबर साफ करण्याऐवजी जुन्या वाहिन्या बदलून कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
आंदोलनाचा इशारा
आमदार निवासासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाजवळ जर ही अवस्था असेल तर सामान्य वस्त्यांचे काय? प्रशासनाने तातडीने दुरुस्ती न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.