

महामार्गावर अपघातांची मालिका
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनचालकांमध्ये संताप
कासा, ता. ३० (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी तवा येथील पुलावर एक कंटेनरचा अपघात झाला होता, तर शनिवारी चिंचपाडा येथील पुलावर खड्ड्यांमुळे दोन दुचाकी धडकल्या होत्या.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक उड्डाणपूल, सांधे तसेच पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सध्या विविध ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असली तरी आवश्यक सूचनाफलकांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी स्पष्ट सूचना नसल्याने वाहनचालकांची गफलत होत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदारांकडून सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रभावी उपाययोजना करून रस्त्याची गुणवत्ता सुधारावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
़़़़़़़़़़़ः----------------------------
महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्यास १०० ते २०० मीटर आधी स्पष्ट सूचनाफलक लावणे बंधनकारक आहे. तसेच सिमेंट बॅरिकेट वापरणेही नियमबाह्य आहे. मात्र, प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन होत अपघात घडत आहेत.
- हरबंस नन्नाडे, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य चालक-मालक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.