

बांबू कारागिरांना टूलकिटचे वितरण
कासा (बातमीदार) ः भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रमांतर्गत डहाणू येथे बांबू कारागिरांना आधुनिक टूलकिटचे वितरण करण्यात आले. डेव्हलपमेंट कमिशनर (हँडिक्राफ्ट्स) कार्यालय, वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या प्रायोजकत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला डहाणूचे आमदार विनोद निकोले, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, वरिष्ठ सहाय्यक संचालक (हस्तकला) चंद्रशेखर सिंह तसेच खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक शिश पाल सिंह उपस्थित होते. यावेळी स्थानिक पातळीवर पारंपरिक कलेतून घरच्या घरी व्यवसाय केल्यास उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण होऊ शकते, असे मत आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.