

गतिरोधकाने वाहनचालकांची भंबेरी
अकरपट्टी ग्रामपंचायत हद्दीत महिलेचा अपघात
बोईसर, ता. ३० (वार्ताहर) : अकरपट्टी ग्रामपंचायत हद्दीत अचानक उभारलेल्या डांबरी गतिरोधकाने झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेवर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण कोणताही फलक नसल्याने चालकांचा घात होत आहे.
अकरपट्टी ग्रामपंचायत हद्दीत साधा प्लॅस्टिकचा गतिरोधक होता. मात्र, अचानक मोठ्या उंचीचा डांबरी गतिरोधक उभारल्याने वाहनचालकांची पूर्णतः भंबेरी उडत आहे. विशेष म्हणजे, या गतिरोधकावर कोणतेही पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर, इशारा फलक नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास धोकादायक झाला आहे. त्यामुळे अपघातानंतर प्रशासनाने तातडीने गतिरोधकावर रंगकाम करावे, अशी मागणी होत आहे.
-----------------------------------
ज्याठिकाणी अपघाती क्षेत्र आहे, तिथे नियमानुसार गतिरोधक आवश्यक आहे. तसेच सूचनाफलक लावणे गरजेचे आहे.
- हेमेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.